जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

By Admin | Updated: November 17, 2014 01:00 IST2014-11-17T00:59:51+5:302014-11-17T01:00:22+5:30

जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

Fraud fraud by making fake documents of the land | जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

नाशिक : देवळाली येथील जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघांसह बालाजी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भाऊसाहेब मुरलीधर फंगार (४७, स्रेहसिद्धी अपार्टमेंट, कलानगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मनोहर भागवत ललवाणी (रा़ तनिष्क पार्क), हिरालाल ललवाणी व बालाजी को-आॅपरेटिव्ह बँकेतील संचालकांनी देवळालीतील सर्व्हे क्र. १३०/अ/३ ची बनावट कागदपत्रे तयार केली़
नाशिकरोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या बनावट कागदपत्रांद्वारे फंगार व इतरांच्या लाभात साठेखत व खरेदीखत करून देऊन फसवणूक केली़ या प्रकरणी साधवानी, ललवाणी व संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fraud fraud by making fake documents of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.