शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

मुथूट दरोड्यातील चौथ्या दरोडेखोराला कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:45 AM

नाशिक : ‘मुथूट’ दरोड्यातील चौथा संशयित दरोडेखोर सुभाष केसरी गौडला (३३, रा. मूळ उत्तर प्रदेश) हरियाणा राज्याच्या फरिदाबादमधील एका औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीमधून गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्दे१० तास शोध : तीन राज्यांमध्ये वावर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘मुथूट’ दरोड्यातील चौथा संशयित दरोडेखोर सुभाष केसरी गौडला (३३, रा. मूळ उत्तर प्रदेश) हरियाणा राज्याच्या फरिदाबादमधील एका औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीमधून गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या.त्यास बुधवारी (दि. २) मोक्का विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, १४ जून रोजी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाºया आंतरराज्यीय सराईत दरोडेखोरांच्या टोळीला सातपूरमध्ये सुभाष गौड याने आश्रय दिला होता. गुन्हा घडल्यापासून तो आपला कबिला घेऊन उत्तर प्रदेशमध्ये दडून बसला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यास अपयश येत होते. पोलिसांनी त्यानंतर तपास थंडावल्याचा बनाव करत सुभाषचे ‘लोकेशन’ मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यामुळे सुभाष गुजरातमधील बलसाडमध्ये असल्याचे ‘स्थिर लोकेशन’ तपासी पथकाला मिळाले. जबरी गुन्ह्याचा कट आखून संघटितपणे सशस्र दरोडा टाकत एका युवकावर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी मुथूट दरोड्याच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई केली आहे. या दरोड्याचा कट शिजविण्यापासून तो प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यापर्यंत १२ दरोडेखोरांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक