शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चौदा हजार पुलांची होणार दुरुस्ती

By admin | Updated: February 28, 2017 01:30 IST

ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर सरकारला जाग आली असून, ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम भवन येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी सदर माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. रायगड जिल्ह्णातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची दुर्घटना महाड शहराजवळ आॅगस्ट महिन्यात घडली होती. या घटनेनंतर राज्यातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. या घटनेने सरकारला हादरा बसल्याची कबुली देत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीमार्फत बांधकामाचे परीक्षण करून राज्यातील एकूण १४ हजार पुलांच्या स्थितीचा अहवाल सरकारने प्राप्त करून घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात जे पूल अत्यंत जीर्णावस्थेत आहे त्यांची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. चालू वर्षासाठी पुलांच्या दुरुस्तीकरिता एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांमध्ये राज्यातील एकूण चौदा हजार पुलांची दुरुस्ती व बांधणी करण्यात सरकारला यश येईल, असे पाटील म्हणाले. या दुरुस्तीच्या कामासाठी विहित प्रक्रियेद्वारे संबंधित बांधकाम ठेकेदारांची निवड करावी जेणेकरून दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण होतील, असेही पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.