पिकअप-मोटारसायकल अपघातात चार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:41 IST2019-01-10T17:41:10+5:302019-01-10T17:41:39+5:30
भरधाव वेगाने जाणारी पिक- अप आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चौघे तरु ण जागीच ठार झाले. हे चारही तरुण १८ ते २० वयोगटातील आहेत. सदर धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास औंदाणे शिवारातील सटाणा -ताहाराबाद रोडवर घडली. अपघातग्रस्त सर्वच तरूण मालेगाव जवळील दुधे तळपाडे येथील रहिवासी आहेत. या दुर्घटनेमुळे दुंधे तळवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

पिकअप-मोटारसायकल अपघातात चार तरुण ठार
दुंधे तळवाडे गावातील काही तरूण आज कंदूरीच्या कार्यक्र मासाठी अंतापूरला गेले होते.कंदूरीचा कार्यक्र म आटोपून एकाच मोटारसायकलवरून चौघे तरूण गावी येण्यासाठी निघाले होते. या तरूणांची मोटारसायकल औदांणे शिवारातील सटाणा -ताहाराबाद महामार्गावरून दुंधे तळवाडेकडे जात असतांना समोरून येणाऱ्या पिक-अप यांच्यात जोरदार धडक दिली.अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की या अपघातात मोटारसायकलवरील चौघेही तरूण जागीच ठार झाले. अपघातामुळे काही काळ सटाणा -ताहाराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच दुंधे तळवाडे गावावर एकच शोककळा पसरली. अनिल दगडू माळी, समाधान दादाजी पटाईत, शरद तानाजी सोनवणे आणि अरूण प्रकाश ठोंबरे अशी मृतांची नावे असून सर्वच जण महंत भाणेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.