शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:22 PM

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी  रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.  वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.  मनोज पांचाळ, रा. गुजरात  व मनोज चव्हाण अशी अपघातातील ...

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी  रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.  वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.  मनोज पांचाळ, रा. गुजरात  व मनोज चव्हाण अशी अपघातातील जखमींची नावे असून, अन्य  तिघांची ओळख पटू शकलेली  नाही.रविवारी (दि.२६) संगमनेरकडून नाशिककडे पुठ्ठे घेऊन जाणारा ट्रक (एमएच १४ ईएम ९३४७) दोडी बुदू्रक शिवारात हॉटेल गायत्रीसमोर उलटला. सदरचा मालट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने नाशिक-पुणे रस्त्यावरची वाहतूक नांदूरशिंगोटे बायपासपासून एकेरी करण्यात आली होती.  त्यानंतर दोडी खुर्द शिवारातील फाट्यावर सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने मोटारीचे मटेरिअल घेऊन जाणारा दहाचाकी मालट्रक (क्र. जीजे ३ एटी ४६५४) व समोरून येणारा ट्रक (क्र. एमएच १७ एजे ९९५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली.यावेळी मागून येणारा उसाची वाहतूक करणारा आयशर ट्रक (जीजे ०८ वाय ७३६०) या अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. याच वेळी संगमनेरकडून सिन्नरकडे येणारा भरधाव ट्रक (क्र. एमएच १७ एजी ९९५७) या ट्रकवर जाऊन आदळला. तसेच ट्रक (क्र . एमएच १५ एजी ३७९८) हा सुध्दा जाऊन धडकला. असा हा विचित्र अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले त्यांना नाशिक व संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेतली.  या विचित्र अपघातांमुळे राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. नंतर एकरी वाहतूक सुरू करण्यात आली. वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. अंढागळे हे करीत आहे. अन्य दोन जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही. अपघातात ३ ट्रक रस्त्यावर उलटल्या. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा चक्काचुर झाला. जखमींना बाहेर काढताना अडचण निर्माण झाली होती. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, तीन क्र ेन व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातात तीन चालक व दोन किल्नर गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी नाशिक व संगमनेर येथे खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा