दोन दुचाकींच्या अपघातात चौघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:44 IST2021-03-14T21:20:38+5:302021-03-15T00:44:50+5:30
शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.

दोन दुचाकींच्या अपघातात चौघे गंभीर जखमी
शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. रविवारी (दि.१४) दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास गंगाराम शिंदे (राहणार कोडवेल, तालुका सटाणा) हे पत्नी सिंधुबाई शिंदे यांच्या सह पल्सर मोटर सायकल वरून (एम एच १५-९६०६) चांदवड कडून नाशिककडे जात असताना समोरून हिरामण बर्डे व पंडित माळी राहणार चिंचोली तालुका अहवा डांग हे हिरो होंडा मोटारसायकल वरून (एम एच ४१ जे ११६२) रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक होवून हा अपघात झाला.
या अपघातामध्ये चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिरवाडे फाट्यावरील रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली व गंगाराम शिंदे व सिंधूताई शिंदे यांना जबरदस्त मार लागल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पीटलमधे अतीदक्षता विभागात तर बाकी जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.