वडाळीभोई शिवारात अपघातात चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:18 IST2021-03-01T19:33:55+5:302021-03-02T01:18:07+5:30
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात हॉटेल गावरानजवळील एचपी पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर व इंडिका कारचा अपघात होऊन त्यात चार जण जखमी झाले.

वडाळीभोई शिवारात अपघातात चार जण जखमी
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात हॉटेल गावरानजवळील एचपी पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर व इंडिका कारचा अपघात होऊन त्यात चार जण जखमी झाले.
मुंबई-आग्रा महामार्गावरून एमएच ०२-६७२ ही इंडिगो कार हीच चांदवडकडून नाशिक बाजूकडे सकाळीच दहाच्या सुमारास जात असताना एचपी पेट्रोल पंपावरून ट्रॅक्टर नंबर प्लेट नाही. हा महामार्गावरून डिव्हायडरजवळ रस्त्याच्या बाजूने वळण घेत असताना ट्रॅक्टर व इंडिका कारचा अपघात झाला.
इंडिका कारमध्ये चार जण होते. त्यांना वडाळीभोई येथे प्रथमोपचार करून त्यांना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांचे नाव पत्ता समजले नाही तसेच या घटनेची माहिती वडाळी पोलीस स्टेशनला एका अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे कळविले आहे, असे वडाळीभोई पोलीस स्टेशन सूत्रांकडून सांगण्यात आले.
(०१ एमएमजी ३/४)