दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:45 PM2020-12-05T17:45:48+5:302020-12-05T17:49:39+5:30

अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Four people lost their lives in the cylinder explosion | दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण

दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण

Next
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात मालवली प्राणज्योतभारतनगरची घटना

नाशिक : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नदीकाठालगत असलेल्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी (दि.१) अचानकपणे घरगुती वापरात असलेल्या व्यावसायिक सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत खोलीत राहणारे सहा इसम भाजले होते. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती; मात्र जखमींपैकी चौघा युवकांचा शुक्रवारी (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. या घटनेने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईनाका पोलिसाांनी दिलेली माहिती अशी, येथील मशिदीच्या पाठीमागे असलेल्या चाळीतील-४ क्रमांकाच्या खोलीत सहा कामगार युवक भाडेतत्वावर एकत्र राहत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता अचानकपणे स्फोट होऊन भडका उडाला. या दुर्घटनेत स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घराचे पत्र्याचे छप्पर तर उडालेच; मात्र छप्परवर केलेले सीमेंट-विटांचे बांधकामही कोसळून पडले होते. दरम्यान,परिसरातील रहिवाशांनी तत्काळ रशीद लतीफ अन्सारी (३०), मोहम्मद अमजद अब्दुल रऊफ अन्सारी (३०), मोहम्मद मुर्तुजा अन्सारी (३०) मोहम्मद आफताब आलम (१९) यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरू असलेल्या जखमी आणि मृतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात भाडेकरूची माहिती लपविल्याप्रकरणी घरमालकाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Four people lost their lives in the cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.