दिंडोरी तालुक्यातील चार जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:03 IST2020-05-19T21:58:08+5:302020-05-20T00:03:12+5:30

दिंडोरी तालुक्यातील एकूण पाच जोखमीच्या सहवासातील कोरोना रु ग्णांपैकी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण चार जण बरे झाले असून, तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Four people from Dindori taluka released from coronation | दिंडोरी तालुक्यातील चार जण कोरोनामुक्त

दिंडोरी तालुक्यातील चार जण कोरोनामुक्त

दिंडोरी : तालुक्यातील एकूण पाच जोखमीच्या सहवासातील कोरोना रु ग्णांपैकी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण चार जण बरे झाले असून, तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी नऊपैकी नाशिक येथे उपचार घेत असलेल्या निळवंडी व इंदोरे येथील रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता नाशिक येथे दोन तर दिंडोरीत तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिंडोरी रुग्णांच्या सहवासातील अतिजोखमीच्या सर्व व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळत तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीतील कोविड हॅल्थ सेंटरमध्ये पाच रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदरचे अहवाल प्राप्त झाले असून दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी डॉक्टरांच्या टीमने त्यांचे टाळ्या वाजवून व फुलांची उधळण करुन स्वागत केले व त्यांना घरी सोडण्यात आले.

Web Title: Four people from Dindori taluka released from coronation