ट्रॅव्हल एजंटकडून चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:27 IST2019-07-06T00:25:03+5:302019-07-06T00:27:44+5:30
जयभवानीरोड येथील ट्रॅव्हल एजंटकडून चार प्रवाशांच्या युरोप टूरसाठी सव्वादोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रॅव्हल एजंटकडून चार लाखांची फसवणूक
नाशिकरोड : जयभवानीरोड येथील ट्रॅव्हल एजंटकडून चार प्रवाशांच्या युरोप टूरसाठी सव्वादोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयभवानीरोड येथील महादेव देबनाथ हे ट्रॅव्हल एजंटचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे युरोप टूरला जाण्यासाठी दोघा दाम्पत्यांनी पॅकेजची विचारणा केली होती. देबनाथ यांनी मयूर पाटील यांच्याशी युरोप टूरच्या पॅकेजबाबत चर्चा केल्यानंतर २ लाख २७ हजार ४०० रुपयांचे कोटेशन दिले. यावेळी देबनाथ यांनी सदर कोटेशन रायना टूर्स यांच्या नावाने का नाही दिले अशी विचारणा केली असता मयूर पाटील याने हॉलीडे २४७ नावाने वेलोनिया एनडीए बावधन पुणे येथे स्वत:ची टूर कंपनी सुरू केली असल्याचे सांगितले. देबनाथ यांनी पाटील यांच्या बॅँकेच्या खात्यावर तीन टप्प्यात २ लाख २७ हजार ४०० रुपये २६ एप्रिल २०१९ पर्यंत जमा केले. त्यानंतर देबनाथ यांनी ग्रीस पॅकेजचे कन्फर्मेशन व्हाउचर पाठवून देण्यासाठी पाटील यांचा पाठपुरावा केला. त्यानंतर संशयित मयूर पाटील याचा मोबाईल बंद होता.