ट्रॅक्टर बंधा-यात उलटून पाच महिलांचा मृत्यू, नाशिकमधील मालेगाव तालुक्यात भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:56 IST2017-10-24T18:33:40+5:302017-10-24T18:56:56+5:30

तालुक्यातील अजंग दाभाडी रस्त्यावरील ढवळी विहीर शिवारातील बंधा-यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये सुमारे २३ मजूर होते.

 Four laborers died in the tractor tied | ट्रॅक्टर बंधा-यात उलटून पाच महिलांचा मृत्यू, नाशिकमधील मालेगाव तालुक्यात भीषण अपघात

ट्रॅक्टर बंधा-यात उलटून पाच महिलांचा मृत्यू, नाशिकमधील मालेगाव तालुक्यात भीषण अपघात

मालेगाव : तालुक्यातील अजंग दाभाडी रस्त्यावरील ढवळी विहीर शिवारातील बंधा-यात मजुरांना घेउन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये सुमारे २३ मजूर होते. हे सर्व मजुर जवळच असलेल्या शेतक-याच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. मृतांमध्ये संगीता गोरख भदाणे, उषाबाई गणेश भदाणे, रोहिणी रतन शेलार यांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. अंधार पडल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. 

 मालेगाव अग्निशामक दलाचे सहा जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मदतकार्य सुरू केले असून   मृतदेह तलावातून बाहेर काढले आहेत. शोधमोहीम सुरूआहे. 

Web Title:  Four laborers died in the tractor tied