अवनखेड शिवारात अपघातात चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:09 IST2018-03-11T00:09:52+5:302018-03-11T00:09:52+5:30
दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील अवनखेड शिवारात शुक्रवारी सायंकाळी स्विफ्ट डिझायर कारचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले.

अवनखेड शिवारात अपघातात चौघे जखमी
दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील अवनखेड शिवारात शुक्रवारी सायंकाळी स्विफ्ट डिझायर कारचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक - कळवण मार्गावरील अवनखेड शिवारात सायंकाळच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बाबाजी ईश्वर पटेल (६८), सरोजबेन पटेल (६०), भावनाबेन पटेल (४३), प्रवीण मदन पटेल (४८) सर्व राहाणार जरासंघ, ता. खांबन (गुजरात) हे एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले असून, जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.