शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी; नागरिकांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 11:26 IST

Nashik : वाकला, जातेगांव गोंडेगांव बोढरे या परिसरात बिबट्याची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या पकडतांना तो जाळ्यातून निसटला व पसार झाला. 

नांदगाव (नाशिक)- तालुका सीमेवरील वाकला शिवारात स्मशानभुमीजवळील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ बिबट्याने दोन शेतकरी व दोन वनविभागाचे कर्मचारी यांना गंभीर जखमी केले. या घटनेने वाकला, जातेगांव गोंडेगांव बोढरे या परिसरात बिबट्याची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या पकडतांना तो जाळ्यातून निसटला व पसार झाला. 

नांदगांव चांदेश्वरी, परधाडी जंगलात वास्तव्याला असलेला बिबट्या डिगू सोनवणे यांच्या वाकला शिवारातील डाळींब बागेत दिसला, शेतकरी बाळू शेजवळ हे बिबट्याला हाकलण्यासाठी गेले. तेव्हा बिबट्याने शेजवळ यांच्यावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये चांगलीच झुंज झाली. शेजवळ यांनी बिबट्याचे दोन्ही जबडे दोन्ही हातांनी ताणून धरले तरी देखील बिबट्याने शेजवळ यांना शंभर फूट फरफटत ओढून नेले. चित्रपटात शोभेल असा हा थरार होता. 

दरम्यान, शेजारी सुयश जाधव  मोठ्या हिंमतीने हातात काठी घेऊन बिबट्यावर चालून गेले. तेव्हा बिबट्याच्या मार्गात बंधाऱ्याची भिंत आडवी आल्याने त्याला पुढे जाण्यासाठी चाल मिळाली नाही. म्हणून त्याने थांबून जाधव यांच्यावर पंजा मारून त्यांना जखमी केले आणि तिथून पळ काढला. सुयश जाधव यांचे प्रसंगावधान व धैर्य यामुळे  बाळू शेजवळ यांचे प्राण वाचले. दोघांच्या झुंजीची वार्ता गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. शेकडो गावकरी घटनास्थळी  धावले. दोघा जखमींना औरंगाबादच्या  घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.  

यानंतर शेकडो लोकांनी दुर अंतरावरून रिंगण करुन बिबट्या तेथेच थांबविला. तो झुडपात लपून बसला होता.  कन्नड वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन दाखल झाले. त्यांनी ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला व त्याठिकाणी जाळे टाकून पकडत असतांना बिबट्याने वनविभागाचे शेख आणि आमले या दोन कर्मचाऱ्यावर हल्ला करुन तो जाळ्यातून निसटला. नांदगांव तालुक्यातील चांदेश्वरी, परधाडी जंगलातून ढेकु गावाकडे आलेला बिबट्या जवळच्या जंगलात पसार झाल्याची माहिती वाकला सरपंच गोरख बोढरे यांनी वनविभाग व पोलीसाना संपर्क करुन दिली. या भागातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक