नाशिकमध्ये घरफोडीत सोन्याची सात बिस्कीटे अन् पाच किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 16:54 IST2017-11-09T16:39:27+5:302017-11-09T16:54:15+5:30

गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद

Four gold biscuits and five kg silver lamps from Chanakya bungalow in Nashik | नाशिकमध्ये घरफोडीत सोन्याची सात बिस्कीटे अन् पाच किलो चांदी लंपास

नाशिकमध्ये घरफोडीत सोन्याची सात बिस्कीटे अन् पाच किलो चांदी लंपास

ठळक मुद्दे दागिण्यांमध्ये १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका  घरफोडीमध्ये सुमारे चौदा लाखांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद चांडक यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयिताविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे. अद्याप पोलिसांना यादव हा मिळून आलेला नाही. चोरी गेलेल्या दागिण्यांमध्ये १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे असा एकूण आठ लाख ७५ हजार रुपयांचे सोने तसेच पाच किलो वजनाचे चांदीचे दगड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करत आहे.

Web Title: Four gold biscuits and five kg silver lamps from Chanakya bungalow in Nashik