मनमाडच्या सुधारगृहातून चौघांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:41 IST2021-10-30T01:40:11+5:302021-10-30T01:41:14+5:30
मनमाड येथील बालसुधारगृहात चार बाल आरोपीनी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाण करून पलायन केले.बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असला तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले.

मनमाडच्या सुधारगृहातून चौघांचे पलायन
मनमाड: येथील बालसुधारगृहात चार बाल आरोपीनी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाण करून पलायन केले.बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असला तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. येथील बालसुधारगृहात शुक्रवारी तीन बाल आरोपीना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अल्पवयीन असल्याने त्यांना येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. बालसुधारगृहाचा कर्मचारी योगेश बोदडे हा जेवण देण्यासाठी गेला असता चौघांनी त्याच्यावर हल्ला केला.अचानक झालेल्या गोंधळाचा फायदा घेत चौघांनीही पलायन केले. या बाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पळून गेलेल्या बाल आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले आहे.