दिवाळीत बँकांना चार दिवस सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:43 AM2018-10-28T00:43:35+5:302018-10-28T00:44:08+5:30

दिवाळीत बँकांना चार दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजेला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही

Four days holidays to the banks of Diwali | दिवाळीत बँकांना चार दिवस सुटी

दिवाळीत बँकांना चार दिवस सुटी

Next

नाशिक : दिवाळीतबँकांना चार दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजेला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिन्यातील दुसरा शनिवार (दि.१०) असल्याने बँका बंद राहणार असून, लगोलग रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळेही बँका बंद राहणार असल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.  दिवाळीच्या कालावधीत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औद्योगिक वसाहतींसह विविध क्षेत्रातील कामगार वर्गाचे वेतन थेट बँके च्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्यानंतर दुसºया आठवड्यात लगोलग दिवाळी सुरू होत असून, या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राहकासोबतच अनेक व्यापाºयांचीही गैरसोय होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांमध्ये बँकांचे व्यवहार करण्यासाठी सोमवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते. जवळपास सर्वच बँकांनी आॅनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली असून, शहरातील एटीएमचा ग्राहकांना आधार मिळणार आहे. मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अ‍ॅप आणि आॅनलाइन व्यवहार करीत नाही. अनेक जण रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. अशा ग्राहकांना मात्र रोख रकमेची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
रोकड मिळणे कठीण
दिवाळीच्या काळात असलेल्या चार दिवसांच्या सुट्यांमुळे बाजारात रोकडटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण घरातील देवी-देवतांसह रोख रकमेचीही पूजा करतात. त्यासाठी अगोदरच बँकेतून रोकड काढली जाते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून बँकेतून एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून रोख रक्कम काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांसोबतच एटीएममध्येही रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Four days holidays to the banks of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.