शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नागरेसह चौघांना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: January 4, 2017 00:11 IST

बनावट नोटा प्रकरण : नाशिकरोड कारागृहात रवानगी

नाशिक : १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघांची मंगळवारी (दि़३) न्यायाधीश डी़ व्ही. देढीया यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ या चौघांचीही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, संशयित अग्रवाल याच्याकडून पोलिसांनी संगणकाचा सीपीयू व हार्ड डिस्क जप्त केली आहे़  पुणे आयकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा, तर १़८० लाख रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या़ पोलिसांनी संशयित नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून बनावट नोटा छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशीन, शाई, कागद जप्त करण्यात केले़ तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कमही शोधून काढली़  पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांपैकी रमेश पांगारकर, संतोष गायकवाड, डॉ़ प्रभाकर घरटे, ईश्वर परमार, नीलेश लायसे, गौतम जाधव, प्रवीण मांढरे, राकेश कारखूर यांची बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी (दि़२) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर उर्वरित संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी व पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अग्रवाल यांना आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ या चौघांचीही कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ पोलिसांनी केलेल्या तपासात नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार तर अग्रवाल टेक्निशियन असल्याचे समोर आले आहे़ तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याचीही त्यांची तयारी होती़  दरम्यान, पोलिसांनी बनावट नोटांसाठीचा कागद कुठून आणला, कटर मशीनची खरेदी कोठून केली याचा तपास पूर्ण केला आहे़ तसेच येत्या चार दिवसांत या प्रकरणात आणखी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणातील बाराही संशयितांची आता नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
अग्रवाल हा बनावट नोटांचा टेक्निशियन
पोलीस कोठडीतील संशयित कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) याच्याकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली़ त्यामध्ये बनावट नोटा छपाईचे काम छबू नागरे करीत असला तरी यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य अर्थात टेक्निकल एक्स्पर्टचे काम अग्रवालचे होते़ त्याच्याकडून पोलिसांनी नोटा स्कॅनिंग करण्यासाठी वापरलेला सीपीयू व हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली आहे़ तसेच अग्रवाल हा पूर्वी झेरॉक्स मशीन चालवत असल्याचेही समोर आले आहे़