Four burglaries confiscated; Arrest one | चोरीच्या चार दुचाकी जप्त; एकास अटक
चोरीच्या चार दुचाकी जप्त; एकास अटक

पंचवटी : नाशिक शहर तसेच म्हसरूळ परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हॅँडेल लॉक तोडून चोरी करणाऱ्या पेठरोडवरील ओमकारनगर येथील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
सलमान शेख फय्याज शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, गेल्या आठवड्यात संशयित शेख याने परिसरातून दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच सदरचा संशयित हा मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडवर असलेल्या हॉटेल गावरान परिसरात येणार असल्याची मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार संजय राऊत, सुरेश माळोदे, किशोर रोकडे, मंगेश दराडे, आदिंनी मखमलाबादरोडवरील असलेल्या परिसरात सापळा रचून शेख याला दुचाकीसह ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
नंबर बदलून केला गैरवापर
दुचाकी चोरट्या संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने परिसरातून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली देत सदर दुचाकी या नंबर बदलून वापरत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून बजाज कंपनीची विण्ड, एफ झेड, स्पलेंडर आणि पॅशन प्रो अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

Web Title: Four burglaries confiscated; Arrest one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.