प्रवाशास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:51 IST2018-06-22T23:51:38+5:302018-06-22T23:51:55+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवाशास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वेचा वेळ विचारून आरक्षण कार्यालयातून बाहेर पडताच अजय चव्हाण याला चौघा युवकांनी अडवून शिवीगाळ, मारहाण करीत त्याच्या खिशातील अडीच हजाराची रोकड व डायरी जबरदस्तीने काढून घेतली.
दुचाकीस्वारांनी मोबाइल खेचला
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट सर्कलजवळून पायी जात असलेल्या तरुणाच्या डोक्यात टपली मारून दोघा संशयितांनी मोबाइल खेचून नेल्याची घटना घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज विष्णू अंबापुरे (२५, रा़ वरचे चुंचाळे, अंबड-लिंक रोड) हा सोमवारी (दि़१८) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास परफेक्ट सर्कलजवळून पायी जात होता़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितानी युवराजच्या डोक्यात टपली मारून त्याच्या हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़