शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र विद्यार्थी हिताचे ; शैक्षणिक वर्तुळातून स्वागत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 14:54 IST

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वूभमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (दि. २८) विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाची पद्धतही जारी केली आहे. या पद्धतीमुळे दहीवीच्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेच्या जवळ जाणार निकाल तयार शक्य होणार असून विद्यार्थ्यांची सुरक्षितताही राखली जाणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक मुख्याध्यापकांमध्ये व्यक्त होत असून शासनाने जाहीर केलेले मुल्यमापनाचे सुत्र वास्तववादी आणि विद्यार्थी हिताचे असल्याने शैक्षणिक वर्तुळातून मुल्यमापनाच्या सुत्राचा स्वागत होत आहे.

ठळक मुद्देअंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र विद्यार्थी हिताचेमुल्यांकनामुळे विद्यार्थ्यांचे दडपण कमी होणारशैक्षणिक वर्तुळातून मुल्यांकन पद्धतीचे स्वागत

नाशिक : दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्राची रुतलेले चक्र पुन्हा फिरत होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून दहावीच्या निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत मुल्यामापनाच्या सुत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे.कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार या कडे लाखो विद्यार्थी व पालकांसह शिक्षक आणि संस्थाचालकांचेही लक्ष लागले होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनीही यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची पद्धत निश्चित झाल्याने आता लवकरात लवकर निकाल तयार करून तो जाहीर केल्यास विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे दडपण कमी करणारा निर्णयकोरोनाचे संकट लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शारिरीक आणि मानसिक दडपण कमी करणारा चांगला निर्णय घेतला असून शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा अशाप्रकारे मुल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणे योग्यच आहे. अनेक विद्यार्थी दहावीचे पहिले सत्रही ऑनलाईन अथवा ऑफलाईन शिक्षण घेऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुल्यमापन करणे आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी शिक्षकांवरचा कामाचा ताण वाढणार असून त्यासाठी अपेक्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. -गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल.

मुल्यमापनाची पद्धत वास्तववादी दहावीच्या निकालासंदर्भात शासन निर्णयाचे माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने स्वागत आहे. शासनाने नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून दहावीचा निकाल तयार करण्याचा विचार केल्याने ही बाब विद्यार्थ्याच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व वास्तववादी आहे. मात्र दहावीच्या निकालानंतर अकरावीचा प्रवेशासाठी काठीण्य पातळी तपासणे अडचणीचे होणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यस्तरावर समान नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. - मोहन चकोर, अध्यक्ष, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ.

भविष्यात गुणपत्रिकांची गरज भासणारचविद्यार्थ्यांचे मुल्यमापन होणे आवश्यकच होते. त्यांना भविष्यात या गुणपत्रिकांची गरज भासणारच आहे. परंतु, नव्या पद्धतीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करताना शिक्षकांना अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाची पद्धती सोपी करायला हवी होती. मूल्यमापनासाठी शिक्षकांना शाळेत येऊन जास्त वेळ काम करावे लागेल. - राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीTeacherशिक्षक