शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

देवळाली छावणी परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या पुत्रावर झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:20 IST

कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर

ठळक मुद्देनागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेहल्लेखोरांची ओळख पटली आहे

नाशिक : देवळाली कॅम्प छावणी परिषदेचे माजी अध्यक्ष व रिपाइंचे पदाधिकारी विलास पवार यांचे पुत्र यश पवार उर्फ बिट्टू या युवकारवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी देवळाली कॅम्प भागातील हाडोळा परिसरात गोळीबार केल्याची घटना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जखमी बिट्टू यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला.देवळाली कॅम्प परिसरातील हाडोळा भागात रात्रीच्या सुमारास बिट्टू वावरत असताना त्याच्यावर अचानकपणे हल्लेखोरांने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली. गोळी बिट्टूच्या मांडीत घुसली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोकदेखील बाहेर आले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात बिट्टू पडलेला होता. घटनेची माहिती तत्काळ देवळाली कॅम्प पोलिसांना नागरिकांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी त्वरित पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी बिट्टू यास नाशिकरोड येथील एका रुग्णालयात दाखल केले. यावेळी नाशिकरोड भागात मोठी गर्दी जमली होती. तसेच या गोळीबाराच्या घटनेचे कुठलेही पडसाद लॉकडाउन काळात उमटू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तत्काळ सर्व वरिष्ठ अधिकारी व उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गस्तीपथके यांना तत्काळ नाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरात दाखल होत बंदोबस्तात वाढ करून गर्दीला पांगविण्याचे आदेश दिले. पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकरोड भागात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाच्या आवाराबाहेर जमलेली गर्दी पांगण्यास सुरूवात झाली. यावेळी पोलिसांनी उद्घोषणा करत जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस आुयक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी