शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

माजी आमदार कोतवाल यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:18 IST

चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देलेखी आश्वासन : चांदवडच्या मूलभूत प्रश्नांकडे वेधले लक्ष

चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.आमरण उपोषणात कोतवाल यांच्यासमवेत माजी नगरसेवक ॲड. नवनाथ आहेर, सुनील कबाडे, अनिल कोतवाल, कैलास कोतवाल, विलास पवार, आदित्य फलके, राहुल कोतवाल, मंजूर घासी, भारती देशमुख, किरण वाघ, वाहीद पठाण, भिकचंद व्यवहारे, गणेश खैरनार, जाकीर शहा, राजू बिरार, विजय सांबर, गोकुळ देवरे, भरत माळी, संभाजी सोनवणे, महावीर संकलेचा, राजाभाऊ आहिरे, आनंद बनकर आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोतवाल यांनी यापूर्वीच उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देत नगरपरिषद हद्दीतील मूलभूत व नागरी सुविधांचा अभाव तसेच शासकीय योजना राबविण्यात नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अनेक लाभार्थींना वंचित ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत उपोषणाचाही इशारा देण्यात आला होता; परंतु त्याची दखल न घेतल्याने अखेर कोतवालांनी उपोषणाचे हत्यार उपसले.सन २०१८-१९ या कालावधीत सर्वच प्रवर्गातील गरीब व्यक्तींनी घरकुले मिळण्यासाठी केलेले अर्ज नगरपरिषदेकडे प्राप्त झालेले असताना अवघ्या १२० व्यक्तींना घरकुले मंजूर होऊन घरकुलांची कामे करण्यास सुरुवात झाली. शहरातील अजूनही असंख्य गरीब रहिवासी कच्च्या घरात राहत आहेत. परंतु यात अनेक लाभार्थींची घरकुलाची कामे सुरू केल्यानंतर सदरची कामे निधीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. नवीन घरकुल योजनेचा डीपीआर अद्याप शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला नसल्याची तक्रारही कोतवाल यांनी केली आहे. याशिवाय त्यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष वेधले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप