जिल्हा पोलीस प्रमुखांवर माजी आमदाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:07+5:302021-08-17T04:20:07+5:30
येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. विद्यमान ...

जिल्हा पोलीस प्रमुखांवर माजी आमदाराचा आरोप
येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहरातील प्रांत, तहसीलदार, पुरवठा शाखा व संजय गांधी निराधार शाखेतील अधिकाऱ्यांवर विद्यमान आमदारांचा दबाव नाही. त्यामुळे संजय गांधी योजना राबविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. नागरिकांची कामे रखडली आहेत. शहरात कुत्ता गोळी, गांजा, चरसची सर्रास विक्री केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जात आहे. गुंडागर्दी मुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांच्याकडून स्थानिक यंत्रणेवर दबाव आणला जात आहे. विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मो.इस्माईल पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोपही शेख यांनी केला. शहरातील काही राजकीय लोकांकडून गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचेही माजी आमदार शेख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते असलम अन्सारी, जाकीर शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट....
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. माझे राजकीय विरोधक असल्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. माझे शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे नाहीत. दारू व जुगार,मटका,रेशन भ्रष्टाचार यासारखे दोन नंबरचे व्यवसाय मी करीत नाही. मी एक धार्मिक व्यक्ती आहे. पैशांच्या देवाण-घेवाण पासून दूर राहतो. माझ्यावरील आरोपांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही
- मौलाना मुफ्ती मो इस्माईल, आमदार
कोट....
माजी आमदार रशीद शेख यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात माझ्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. या धाडीमध्ये अवैध धंदे मोडीत काढले आहेत. अवैध धंदे मोडीत काढण्याची कारवाई सुरूच राहणार आहे . नाशिक पोलीस यंत्रणा बॅकफुटवर जाणार नाही. अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले जाईल.
- सचिन पाटील,पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण