ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या मार्गावर; एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

By संजय पाठक | Published: January 2, 2024 02:47 PM2024-01-02T14:47:39+5:302024-01-02T14:48:01+5:30

शिर्डी प्रकरणावरून नाराजी कायम

Former minister of Thackeray group Babanrao Gholap on the path of Shinde group | ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या मार्गावर; एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या मार्गावर; एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

नाशिक- ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप शिंदे गटांच्या मार्गावर असून सोमवारी (दि.२) मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात प्रथम युतीची सत्ता आली तेव्हा बबनराव घोलप यांच्याकडे समाजकल्याण मंत्रीपद हेाते.त्यांची पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असून त्यानुसार पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपर्क मंत्रीपद दिले हेाते. दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्ष प्रवेश देण्यात आला आणि घोलप यांच्याकडील संपर्कमंत्रीपद देखील देण्यात आल्याने नाराज झालेल्या घोलप यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मिलींद नार्वेकर हे आपल्या कामात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप घेालप यांनी केला होता. नंतर पक्षाने त्यांची अद्याप दखल घेतलेली नाही.

दरम्यान, आपण राष्ट्रीय चर्मकार संघाच्या विविध मागण्यांसाठी मु‌ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. चर्मकार समाजाला स्टॉल
मिळावे, बंद झालेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावे यासाठी ही भेट होती. तूर्तास आपण ठाकरे गटात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Former minister of Thackeray group Babanrao Gholap on the path of Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.