शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

चार टन उसापासून साकारले गणरायाचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:24 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे.

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. पंचवटी मधील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘युनिक-इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सुमारे चार टन उसाचा वापर करून लाडक्या बाप्पांचे आकर्षक रूप साकारले आहे.  उसापासूनच यावर्षी गणरायांची मूर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उसाचा वापर करत ‘श्रीं’चे रूप साकारले. ‘जरा हटके’ आगळीवेगळी संकल्पना व तीदेखील पर्यावरणपूरकच असेल याचा वर्षभर विचार करत त्या संकल्पनेतून या मंडळाचे कार्यकर्ते गेल्या २००४ सालापासून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होत असतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला विविध संस्था, संघटनांकडून बक्षिसेही मिळाली आहेत.एकूणच गणेशोत्सवात शहरातील मुख्य आकर्षण पंचवटी भागातील या मंडळाचा गणपती असतो. मागील वर्षी या मंडळाने चक्क पाच हजार चिंचोक्यांपासून गणरायांची सुबक मूर्ती साकारली होती. मंडळाचे अनुप महाजन, रोशन झेंडे, अक्षय झेंडे, अभिजीत वाघ, हरी घोडके, अविनाश वानखेडकर आदी कार्यकर्ते असा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतात.वर्षनिहाय साकारलेली गणेशाची रूपे२००४ : रुद्राक्ष गणेश२००५ : गुळाचा गणपती२००६ : हिºयांचा गणपती२००७ : पुष्प गणेश२००८ : मोत्यांचा गणपती२००९ : चॉकलेट गणेश२०१० : पूजा साहित्यापासून२०११ : गिफ्ट बॉक्सपासून२०१२ : रेशिमबॉलपासून२०१३ : चमकीच्या माळांचा गणपती२०१४ : काचेचा गणपती२०१५ : कुंदन गणेश२०१६ : कामट्यांपासून बनविला गणपती२०१७ : चिंचोक्यामधून साकारले गणराय

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती