ग्रामीण भागात मास्क-सॅनिटायझरचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:39 IST2021-03-05T20:33:18+5:302021-03-06T00:39:47+5:30
मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात मास्क-सॅनिटायझरचा विसर
प्रशासनाने निर्बंध घालूनदेखील नागरिक मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत नाही. ग्रामीण भागात आठवडी बाजारातदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात गर्दी असूनही नागरिक सर्रासपणे विनामास्कचे फिरत असताना आढळून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचादेखील सर्वत्र बोजवारा उडाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून, प्रशासनाने ग्रामीण भागातदेखील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याचे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.