वणी : येथील जैन धर्मस्थानकात पर्युषण महापर्वाची सांगता करण्यात आली.मलकापूर येथील बसंतीबाई संचेती व कंचन संचेती रायपूर येथून मधु रायसोनी, नाशिक येथून मीना कांकरिया अशा चार जैन धार्मिक भगिणी यांच्या उपस्थित पर्युषण महापर्वात आराधना, जप-तप, ध्यान-साधना, आशा व्रतांमध्ये जैन बांधव भगिनींसह युवक-युवती, अबालवृद्धांनी सहभाग नोंदविला. कल्पसूत्रांचे वाचन व त्याचे अर्थासहीत स्पष्टीकरण या आठ दिवसांच्या पर्वात केले जाते. अंतरंगाचा अभ्यास स्वभावातील फेरबदल, विवेकबुद्धी, अवगुणांवर नियंत्रण, मानवी जीवनासाठी आवश्यक व अनावश्यक बाबी, अशा विविध विषयांवर विवेचन करण्यात आले अध्यक्ष मूळचंद बाफना, महेंद्र बोरा, गोटु खाबिया, संजय समदडिया आदी समस्त जैन बांधव उपस्थित होते.
पर्युषण महापर्वाची वणीत सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:19 IST