शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिपती विनायकदादा पाटील पंचत्वात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:44 IST

शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली,

ठळक मुद्देपोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून अखेरची मानवंदना दिलीजिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व हरपले दादांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक :नाशिकचे सांस्कृतिक, साहित्यिक वैभव तसेच जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) सकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या अशा अचानकपणे जाण्याने नाशिकचा जणू सांस्कृतिक, साहित्यीक आधारवडच उन्मळून पडल्याची शोकभावना उपस्थितांमध्ये होती.शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास विनायकदादा यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या निवासस्थान ह्यकदंबवनह्ण येथे नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली. दादांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी दादांचे बंधू सुरेशबाबा पाटील यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदारदिलीप बनकर,  मविप्रच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. शोभा बच्छाव, अनिल कदम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, गुरुमीत बग्गा, वास्तुविशारद अमृता पवार, डॉ. प्राची पवार, नाना महाले, अर्जुन टिळे, रवींद्र पगार, हेमलता पाटील,कोंडाजी आव्हाड, ॲड. भगीरथ शिंदे,शाहू खैरे,डॉ. दिनेश बच्छाव, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, प्रकाश होळकर, प्रा. व्ही. बी. गायकवाड, तुषार पगार, हेमंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूChagan Bhujbalछगन भुजबळSuraj Mandhareसुरज मांढरे