विदेशी बनावट मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 16:53 IST2018-11-20T16:52:38+5:302018-11-20T16:53:26+5:30
जायखेडा : पोलिसांनी धडक कारवाई करीत मोठया प्रमाणात विक्र ीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्य साठ्यासह करंजाड ता.बागलाण येथे एकास मोठया शिताफीने अटक केली.

जप्त केलेल्या मद्यसाठ्यासहसहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व पोलीस कर्मचारी.
जायखेडा : पोलिसांनी धडक कारवाई करीत मोठया प्रमाणात विक्र ीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्य साठ्यासह करंजाड ता.बागलाण येथे एकास मोठया शिताफीने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३७२०० रु पये किमतीच्या ११० बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सटाणा ताहाराबाद रस्त्या वरील करंजाड येथील बसस्थानका जवळ आरोपी आपल्या दोन साथीदारांसह बनावट विदेशी दारू विक्र ीसाठी घेऊन आल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरव यांनी पोलीस कर्मचारी गोरख गर्दे, निकेश कोळी, राजेश साळवे, भोये, गवळी,नेरकर आदींच्या पथका समवेत सापळा रचून मुख्य आरोपी सागर विष्णू बोडके रा. इंदिरा नगर त्र्यंबकेश्वर यास मुद्देमालासह अटक केली. आरोपी कडून अँटीक्यूटिक नावाच्या ३७२०० रु पये किमतीच्या लहान मोठया ११० बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलीस आल्याची कुणकूण लागताच दोन आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.