शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:14 IST

परदेशातील नामवंत शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना महाराष्टÑ शासनाच्या वतीने परदेश शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षी राज्यातून ७५ विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे.

नाशिक : परदेशातील नामवंत शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना महाराष्टÑ शासनाच्या वतीने परदेश शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षी राज्यातून ७५ विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे.  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च शिक्षणाची तयारी केली आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या विद्यापीठाचे किंवा संस्थेचे जागतिक नामांकन ३०० च्या आत आहे अशा संस्थेमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जाते.  ज्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवीचे पूर्णवेळ शिक्षण घ्यावयाचे आहे अशाच विद्यार्थ्याचा यासाठी विचार केला जातो. पदविका किंवा अर्धवेळ अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थी पात्र समजला जात नाही. सदर शिष्यवृत्ती देताना जे काही महत्त्वाचे नियम आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून उत्पन्नाची मर्यादा ६ लाखांपेक्षा जात असता कामा नये, तसेच जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये असणाºया परदेशी विद्यापीठांमध्ये आणि लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.  शासनाकडून दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचा उद्देश सफल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागणार असून, अर्धवट अभ्यासक्रम सोडून दिल्यास शासनामार्फत संबंधित विद्यार्थ्यावर खर्च करण्यात आलेली सर्व रक्कम संबंधित विद्यार्थी किंवा त्याचे पालक किंवा जामिनदार यांच्याकडून एकरकमी वसूल केली जाणार आहे.१० टक्के निधी भरावा लागणारशासनाने देऊ केलेल्या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलेल्या विद्यार्थ्याला शासनाने स्थापन केलेल्या ‘सामाजिक न्याय निधी’मध्ये मिळालेल्या शिष्यवृत्ती रकमेच्या १० टक्के रक्कम निधी म्हणून जमा करावा लागणार आहे. तसेच मागणी केल्यानुसार विद्यार्थ्याला आवश्यक ती कागदपत्रे, करारनामे, बंधपत्रे व हमीपत्रे देणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी