नाशिकच्या पदपथावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:52 AM2018-02-22T11:52:10+5:302018-02-22T11:56:28+5:30

पदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक जास्त

On the footpath of Nashik, the encroachment of various professionals was carried out | नाशिकच्या पदपथावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण कायम

नाशिकच्या पदपथावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण कायम

Next
ठळक मुद्देपदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक जास्तपदपथावर कायमच हातगाड्या उभ्या

नाशिक : महापालिका प्रशासनाने लाखो रु पये खर्च करून नागरिकांसाठी उभारलेल्या पदपथावर हातगाडीधारक तसेच अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक जास्त असे चित्र दिसून येत असल्याने पालिकेने उभारलेला पदपथ नागरिकांसाठी की अतिक्रमण करणाºयांसाठी? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानकाबाहेरील रस्त्याला लागून महापालिका प्रशासनाने काही वर्षांपासून पदपथ तयार केला असला तरी या पदपथावर कायमच हातगाड्या उभ्या राहतात. परिणामी रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना या पदपथाचा काहीच उपयोग होत नसल्याने नागरिकांना मुख्य वाहतूक रस्त्याने मार्गक्रमण करावे लागते. दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर असलेल्या दुकानांसमोर मनपाने पदपथ केला असला तरी या पदपथावर विविध विक्र ेते तसेच हॉटेलधारक टेबल बाहेर ठेवून रस्ता अडवत असल्याने या ठिकाणी व्यावसायिकांनीच पदपथाचा ताबा घेतल्याचे चित्र दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून पदपथावर विविध व्यावसायिक तसेच हातगाडीधारकांनी अतिक्रमण करून पालिकेसमोर आव्हान ठाकले असले तरी महापालिका प्रशासन या अतिक्रमणधारकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: On the footpath of Nashik, the encroachment of various professionals was carried out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.