निमगाव मढ शिवारात आगीत चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:14 IST2018-12-07T23:16:46+5:302018-12-08T00:14:21+5:30

ताळी, ता. येवला येथील शेतकरी अलकाबाई विश्वनाथ जाधव यांच्या निमगाव मढ शिवारातील गट नं. ८१/१ मधील शेतातील चाऱ्याच्या गंजीस दुपारी अकस्मात आग लागली व या आगीत दहा ते बारा ट्रॉली चारा पाहता पाहता जळून खाक झाला.

Fodder blaze in Nimgaon pea Shiva | निमगाव मढ शिवारात आगीत चारा खाक

निमगाव मढ शिवारात आगीत चारा खाक

जळगाव नेऊर : साताळी, ता. येवला येथील शेतकरी अलकाबाई विश्वनाथ जाधव यांच्या निमगाव मढ शिवारातील गट नं. ८१/१ मधील शेतातील चाऱ्याच्या गंजीस दुपारी अकस्मात आग लागली व या आगीत दहा ते बारा ट्रॉली चारा पाहता पाहता जळून खाक झाला. दुपारची वेळ असल्याने व अचानक आग लागल्याने क्षणार्धात पूर्ण चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अग्निशामक दलाचे जवान आले व पाणी टाकून चारा विझविण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त वेळ झाल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला.
निमगावचे तलाठी दत्तात्रय गिरी यांनी पंचनामा केला असून, एक लाखाच्या आसपास नुकसान झाले असून ऐन दुष्काळात ही घटना घडल्याने जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Fodder blaze in Nimgaon pea Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.