शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनविण्यावर भर: संतोष मंडलेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:29 IST2019-06-08T19:26:52+5:302019-06-08T19:29:35+5:30
नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर राहील, असा मनोदय महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला आहे. नाशिककर असलेल्या संतोष मंडलेचा यांची चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांदा निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनविण्यावर भर: संतोष मंडलेचा
नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर राहील, असा मनोदय महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला आहे. नाशिककर असलेल्या संतोष मंडलेचा यांची चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांदा निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
प्रश्न- महाराष्टÑ चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांचा निवड झाली या विषयी काय वाटते?
मंडलेचा: महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीज ही संस्था आहे. त्यामुळे येथे सर्व निर्णय सामंजस्यानेच होतात. ९२ वर्षांनंतर संघटनेची प्रथमच निवडणूक झाली. दोन वर्षाच्या कामगिरीमुळे सभासदांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे ही निवडणूक लढविली. सभासदांनीच मला कौल दिल्याने तीस वर्षांनंतर प्रथमच अध्यक्षपदी निवडणून येण्याची हॅट्रीक करू शकलो.
प्रश्न- दोन वर्षातील तुमची नेमकी कोणती कामे व्यापारी उद्योजकांना भावली असे वाटते?
मंडलेचा- दोन वर्षात अनेक कामे केली. या दोन वर्षातच जीएसटी लागु झाल्याने अनेक अडचणी व्यापारी- उद्योजक बंधूंना अनेक अडचणी आल्या. त्यातून यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न केले. सुरूवातीचा काळ असल्याने या अडचणी होत्या. मात्र नंतर कार्यप्रणाली सुलभ झाली. नोटाबंदीनंतर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी चेंबरने काम केले. प्लास्टीक बंदीमुळे देखील व्यापारी वर्ग अडचणीत होते. त्यावरही तोडगा काढला. टर्कीसह अन्य देशांशी चेंबरने सामंजस्य करार केले. अशा अनेक उपक्रमांमुळे सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असे वाटते.
प्रश्न- तुमच्या नव्या टर्म मध्ये चेंबर शेतक-यांसाठी काय करणार आहे.
मंडलेचा: शेतीचा प्रश्न गंभीर आहे. शेतमालाला हमी भावाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना दिलासा द्यायचा असेल तर युवा शेतकºयाला उद्योजक म्हणून घडवण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. कृषी प्रक्रिया उद्योग त्यांनी सुरू केले तर शेतीला मोठा आर्थिक आधार मिळेल. शिवाय अन्य घटकांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे यंदा या विषयावर भर देण्याचा प्रयत्न आहे.
मुलाखत- संजय पाठक