भोजापूरला पूरपाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 07:03 PM2019-08-24T19:03:07+5:302019-08-24T19:03:31+5:30

येत्या पावसाळ्यात पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पोलीस बंदोबस्तात तालुक्याच्या पूर्व भागातील दुुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्याचे तसेच वरच्या भागात चारी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आपले उपोषण मागे घेतले.

Flooding will leave Bhojpur | भोजापूरला पूरपाणी सोडणार

भोजापूरला पूरपाणी सोडणार

googlenewsNext
ठळक मुद्देलेखी आश्वासन ; शेतकऱ्यांचे उपोषण मागे

सिन्नर : येत्या पावसाळ्यात पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पोलीस बंदोबस्तात तालुक्याच्या पूर्व भागातील दुुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्याचे तसेच वरच्या भागात चारी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आपले उपोषण मागे घेतले.
भोजापूरचे पूरपाणी प्राधान्याने दुुशिंगपूर पाझर तलावात सोडले जावे, यासाठी पूर्व भागातील शेतकºयांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, दुुशिंगपूरचे उपसरपंच कानिफनाथ घोटेकर व कहांडळवाडीचे नबाजी खरात यांच्या नेतृत्वाखाली भोजापूर धरणाच्या भिंतीवर शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून उपोषण सुरू केले होते. दरम्यान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. के. आचट, बी. डब्ल्यू. बोडके, वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी शेतकºयांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. वरिष्ठांच्या आदेशानुसारच पूरपाण्याचे नियोजन केले जात असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. त्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लेखी दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली.
दरम्यानच्या काळात तहसीलदार राहुल कोताडे यांनीही आंदोलक आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून या प्रश्नावर समन्वयाने तोडगा काढत उपोषण मागे घ्यावे, यासंदर्भात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता शरद गायधनी उपोषणस्थळी दाखल झाले.
आंदोलनात चंद्रभान तांबडे, भास्कर कहांडळ, अशोक घेगडमल, सखाहरी कहांडळ, संपत भेंडाळे, कचरु कहांडळ, इंद्रभान घोटेकर, संपत काळे, कैलास ढमाले, गोरक्षनाथ घोटेकर, किशोर ढमाले, सतीश ढमाले आदी सहभागी होते.
येत्या पावसाळ्यात पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पोलीस बंदोबस्तात दुुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्याचे तसेच वरच्या भागात चारी फोडणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले. पाणी सुरू असल्याच्या काळात या गावातील दहा लोक दिवसा आणि रात्री कालव्यावर गस्त घालतील. याशिवाय पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Flooding will leave Bhojpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.