दरोडेखोर-पोलिसांत नाशकात चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:12 IST2019-03-29T00:10:46+5:302019-03-29T00:12:38+5:30
नाशिक : दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक घडण्याचा थरार नागरिकांनी गुरुवारी (दि.२८) भल्या पहाटे अनुभवला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.

दरोडेखोर-पोलिसांत नाशकात चकमक
नाशिक : दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक घडण्याचा थरार नागरिकांनी गुरुवारी (दि.२८) भल्या पहाटे अनुभवला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
सराफाचे दुकान फोडून लूट करून संशयित दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दरोडेखोर मध्यरात्री दुकान फोडून पळून जात असताना पोलिसांच्या वाहनाने त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग केला.
दरोडेखोरांची गाडी महावितरणच्या विद्युत खांबाला आधारासाठी दिलेल्या ‘ताण’च्या लोखंडी तारेमध्ये अडकून उलटली. त्यानंतर वाहनाच्या आडून दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार करत संशयिताना बेड्या ठोकल्या.