नाशिककरांसाठी पुन्हा 'उडान', बेळगावसाठी 3 फेब्रुवारीपासून विमानसेवा!
By संजय पाठक | Updated: November 24, 2022 15:41 IST2022-11-24T14:20:29+5:302022-11-24T15:41:29+5:30
नाशिकमधून सुरू झालेल्या एअर डेक्कन, जेट एअरवेज, स्टार अलायन्स, स्टार एअर अशा सर्व कंपन्यांच्या सेवा बंद असून सध्या स्पाईस जेटच्या वतीने नाशिक दिल्ली आणि नाशिक- हैदराबाद एवढीच सेवा सुरू आहे.

नाशिककरांसाठी पुन्हा 'उडान', बेळगावसाठी 3 फेब्रुवारीपासून विमानसेवा!
नाशिक : केंद्रशासनाच्या उडान येाजने अंतर्गत नाशिकच्याविमानतळावरून सुरू झालेल्या विमान सेवा एकेक करत बंद पडत असताना येत्या 3 फेब्रुवारीपासून स्टार एअरची बेळगाव- नाशिक- बेळगाव ही विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.
नाशिकमधून सुरू झालेल्या एअर डेक्कन, जेट एअरवेज, स्टार अलायन्स, स्टार एअर अशा सर्व कंपन्यांच्या सेवा बंद असून सध्या स्पाईस जेटच्यावतीने नाशिक-दिल्ली आणि नाशिक- हैदराबाद एवढीच सेवा सुरू आहे. गेल्या महिन्यात स्टार एअरची बेळगाव- नाशिक सेवा बंद झाली तर अलायन्स एअरची दिल्ली- अहमदाबाद- नाशिक- पुणे- बेळगाव ही हॉपिंग फ्लाईट 1 नोव्हेंबरपासून बंद आहे. त्यामुळे नाशिककरांत नाराजी आहे.
नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून उडान योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सिंधिया यांनी देखील तसे आश्वासन दिले होते. दरम्यान, आता 3 फेब्रुवारीपासून स्टार एअरची बेळगाव- नाशिक- बेळगाव ही सेवा सुरू हेाणार आहे.