सेंट झेवियर्स शाळेत ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:53 IST2020-08-17T16:52:50+5:302020-08-17T16:53:40+5:30
मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ग्रामीण रु ग्णालयाचे कोविड नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मनमाड येथे पंचशील वाचनालयाच्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ग्रामीण रु ग्णालयाचे कोविड नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक फादर साबी कोरीया, पर्यवेक्षक सिस्टर शैला, मुख्याध्यापिका अर्चना निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुधाकर कातकडे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय हेमंत वाले यांनी करु न दिला.
पंचशील वाचनालय, मनमाड
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करण्यात आले. पंचशिल सार्वजनिक वाचनालय तसेच भीमसैनिकांच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण पगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तसेच येथील मनोरम सदन शाळेत मुख्याध्यापीका वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.