शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी २७ जागा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:31 IST

दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आले असून, ते संबंधित व्यावसायिकांना भरावे लागणार आहे.

नाशिक : दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आले असून, ते संबंधित व्यावसायिकांना भरावे लागणार आहे.महापालिकेच्या वतीने दरवर्षीच सुरक्षित ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लावण्यासाठी जागा निश्चित केल्या जातात. यंदाही त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात पूर्व विभागात राणे नगर कॉर्नर, पौर्णिमा स्टॉपजवळ, कलानगर (इंदिरा नगर), इंदिरानगर येथील ओंकार गारमेंटसमोरील जागा अशा जागा असून, पश्चिम विभागात गोल्फ क्लब मैदान (इदगाह मैदान), संदीप हॉटेलसमोरील जागा, पंचवटी विभागात तपोवनातील साधुग्राम परिसर, अमृतधाम सोसायटीलगत, नवीन बळी मंदिराच्या पूर्व जागेस, पेठरोड पाटालगतच्या मोकळ्या जागेत, दिंडोरीरोडवरील आरटीओ आॅफिसकडे जाणाऱ्या लिंक रोडवर, म्हसरूळ येथील गीतानगर याठिकाणी जागा स्टॉलसाठी आहेत.नाशिकरोड विभागात चेहेडी ट्रक टर्मिनस, चेहेडी पंपिंगरोडवरील मनपाच्या खुल्या जागेत, के. एन. केला शाळेशेजारी मोकळ्या जागेत, गाडेकर मळ्यासमोरील मोकळ्या जागेत, शिवाजीनगर समाजमंदिर मैदान, जेलरोड, मनपा शाळा क्रमांक १२५चे मैदानालगतची जागा, जेलरोडवरील फॅशन फॅब्रिक्सपासून दुकानासमोरील पश्चिमेस फुटपाथलगतची जागा अशा प्रकारच्या सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.तसेच सातपूर विभागात क्लब हाउस मैदान, आनंदवल्ली मनपा शाळेजवळ, तसेच शिवाजीनगर येथील कार्बन नाका परिसर आणि सिडको विभागात जुने शॉपिंग सेंटर, लेखानगर पाठीमागे, राजे संभाजी स्टेडियममध्ये, पवननगरच्या पाण्याच्या टाकीजवळील नियोजित स्टेडियमच्या जागेत, पाथर्डी फाटा भाजीबाजाराच्या खुल्या जागेत आणि मौजे पाथर्डी शिवार सर्व्हे नंबर ९११ प्लॉट नंबर ७६च्या कंम्पाउंडलगत अशाप्रकारच्या जागा निश्चित असून, पुढील आठवड्यात २५ व २६ आॅक्टोबर रोजी लिलाव होणार आहेत.क्रीडांगणात फटाके विक्रीने आश्चर्यमहापालिकेच्या वतीने क्रीडा संकुलातील जागेत फटाके विक्रीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजे संभाजी स्टेडियम, क्लब हाउस सातपूर अशा प्रकारच्या मैदानांचा समावेश केल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfire crackerफटाके