पाच हजार केबलचालक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:44 IST2018-08-25T00:43:59+5:302018-08-25T00:44:53+5:30
उपग्रहाद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम केबलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणाऱ्या व्यवसायात आता रिलायन्स कंपनीने उडी घेतल्यामुळे स्थानिक केबलचालकांचे धाबे दणाणले असून, मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणे नाशकातही रिलायन्सला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेते तसेच केबलचालकांनी एकत्र येऊन रिलायन्सला बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.

पाच हजार केबलचालक संकटात
नाशिक : उपग्रहाद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम केबलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणाऱ्या व्यवसायात आता रिलायन्स कंपनीने उडी घेतल्यामुळे स्थानिक केबलचालकांचे धाबे दणाणले असून, मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणे नाशकातही रिलायन्सला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेते तसेच केबलचालकांनी एकत्र येऊन रिलायन्सला बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक जिल्ह्णात लाखो केबल ग्राहक असून, त्यांच्यासाठी हाथवे, डेन, इन आदी कंपन्यांच्या माध्यमातून केबलचालकांनी घरोघरी जोडणी दिली आहे. दरमहा ग्राहकांकडून केबलचे पैसे गोळा करून त्यातील काही रक्कम सरकार जमा केली जात आहे. जिल्ह्णात जवळपास पाच हजारांहून अधिक कर्मचारी या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत असताना आता रिलायन्स कंपनीने या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना केबल सेवा देण्याचे ठरविले आहे. रिलायन्सच्या आगमनामुळे अन्य खासगी कंपन्या धोक्यात येऊन त्यांचे केबलचालक व आॅपरेटर यांना व्यवसाय बंद करावा लागणार आहे. मुंबई, ठाण्यातील केबलचालक या विषयावर एकत्र आले असून, त्याचे पडसाद नाशकातही उमटले आहेत. या व्यवसायातील केबलचालक रिलायन्समुळे बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करीत आहे. शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसने रिलायन्स कंपनीला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत या संदर्भात शनिवारी केबलचालकांचा मेळावा होत असून, त्यात या संदर्भातील अधिकृत भूमिका ठरणार आहे.