शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार व्यापारी बेपत्ता

By admin | Updated: April 2, 2015 00:53 IST

पाच हजार व्यापारी बेपत्ता

नाशिक : व्यापारी-व्यावसायिकांचा असहकार आणि शासनाची प्रतिकूल भूमिका या दुष्टचक्रात अडकलेल्या महानगरपालिकेच्या खजिन्यात मार्चअखेर सरचार्जसह ६७५ कोटी रुपये एलबीटी (स्थानिक संस्था कर) जमा झाला आहे. पालिकेने एलबीटीची थकबाकी आणि विवरणपत्र मुदतीत दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली; परंतु मार्चअखेर १७ हजार ५९२ व्यापारी-व्यावसायिकांनीच विवरणपत्र दाखल करत एलबीटीला प्रतिसाद नोंदविला आहे. सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांच्या अपूर्ण पत्त्यामुळे महापालिकेने आता त्यांची शोधमोहीम राबविण्याचे ठरविले असून, विक्रीकर खात्याकडून माहिती संकलित करून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.महापालिकेने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ७२० कोटी एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. परंतु गेल्या आर्थिक वर्षात व्यापाऱ्यांनी पुकारलेला असहकार आणि शासनाचीही एलबीटी रद्द करण्याबाबतची भूमिका यामुळे महापालिकेच्या वसुलीवर परिणाम होत गेला. महापालिकेला सुरुवातीला प्रतिमाह ५२ ते ५४ कोटी रुपये एलबीटी वसूल झाला. दिवाळीच्या दरम्यान वसुली ६३ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. नोव्हेंबरनंतर महापालिकेने एलबीटीची थकबाकी व मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आणि सुमारे साडेसात हजार व्यावसायिकांना नोटिसा बजावतानाच हजाराहून अधिक व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली होती. मात्र, व्यापारी महासंघाच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आयुक्तांना सांगावा आल्याने महापालिकेने कारवाई स्थगित केली होती. तरीही ३१ मार्चअखेर १७ हजार ५९२ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल करत एलबीटीला प्रतिसाद दिला आहे. मात्र, पाच हजार व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा अपूर्ण पत्त्यामुळे परत आल्या असून, महापालिकेने आता त्यांची शोधमोहीम राबविण्याचे ठरविले आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर विक्रीकर विभागाने १६ हजार व्यापारी-व्यावसायिकांची यादी महापालिकेला सादर केली होती. या यादीत अनेक त्रुटी आढळून आल्याने महापालिका वर्षभर चाचपडतच राहिली आहे. आता अपूर्ण पत्त्यामुळे पालिकेच्या रडारवर न आलेल्या व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती विक्रीकर विभागाकडून मिळविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.