येवल्यात पाच पॉझिटिव्ह; १६ कोरानामुक्त घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:16 IST2020-11-19T20:46:16+5:302020-11-20T01:16:18+5:30
येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

येवल्यात पाच पॉझिटिव्ह; १६ कोरानामुक्त घरी परतले
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेने ११ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने ११ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या येवला आगारातील वाहक-चालकांची कोरोना चाचणी केली. तालुक्यातील ५ संशयितांचे अहवाल मंगळवारी (दि.१७) पॉझिटिव्ह आले आहेत, तालुक्यातील एकूण बाधित रुग्णसंख्या १०३९ झाली असून, आत्तापर्यंत ९८१ बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण ५१ बाधितांचा बळी गेला आहे. सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.