करंजी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 14:30 IST2018-11-10T14:30:24+5:302018-11-10T14:30:37+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील बिबटयाचे वाढते हल्ल्यांनी परिसीमा गाठली असून करंजी ता.निफाङ येथे सहा वाजेच्या सुमारास लागोपाठ तीन चालत्या मोटरसायकल चालकांवर हल्ला करून बिबट्याने पाच जणांना जखमी केल्याची घटना घडली.

करंजी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी
सायखेडा : गोदाकाठ भागातील बिबटयाचे वाढते हल्ल्यांनी परिसीमा गाठली असून करंजी ता.निफाङ येथे सहा वाजेच्या सुमारास लागोपाठ तीन चालत्या मोटरसायकल चालकांवर हल्ला करून बिबट्याने पाच जणांना जखमी केल्याची घटना घडली.जखमींमध्ये एका बालिकेचा समावेश आहे.त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शुक्र वार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घराकङे जातांना करंजी येथील खारा नाला जवळ रस्त्यावरून मोटार सायकल वर जातांना खंङू बोराङे हे पत्नी सुनिता बोराङे (४०) व मुलगी प्रज्ञा (७) सोबत करंजी येथे घरी जात असतांना अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यात प्रज्ञा ही चिमुकली व तिची आई सुनिता या जखमी झाल्या.सुनिता यांच्या हाताला तर प्रज्ञा हिच्या दोन्ही मांड्यांना जखमा झाल्या आहेत. त्यानंतर कैलास नारायण ठोंमरे (४६) हे पण घरी जात असतांना त्याच्यावरही बिबट्याने खारा नाला येथेच हल्ला केला. त्यांच्या हाताला व कंबंरेला जखम झाली आहे.त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले.त्यांना तातडीने निफाङ येथे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच याच ठिकाणी मोटरसायकल वरून घरी जातांना संतोष गोसावी व मंगेश गोसावी यांच्यावरही हल्ला केला. गोदाकाठ भागात मोठया प्रमाणात ऊस क्षेत्र असल्याने बिबट्याना लपण्यासाठी योग्य जागा असल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या परिसरात वन्विभागाने पिंजरा लावला आहे.