एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:26 IST2018-04-13T00:26:02+5:302018-04-13T00:26:02+5:30

वणी : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव भागातील गळपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाली असून, बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

Five people from a family are poisoned | एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

ठळक मुद्देबाधितांची प्रकृती स्थिरपिठलं, भाकरी सेवनानंतर पाचही सदस्यांची प्रकृती खालावली

वणी : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव भागातील गळपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाली असून, बाधितांची प्रकृती स्थिर आहे. बोरगाव परिसरातील गळपाडा येथील जाधव कुटुंबीय वास्तव्यास आहे. जेवणासाठी त्यांनी पिठलं व भाकरी तयार केली होती. त्याच्या सेवनानंतर पाचही सदस्यांची प्रकृती खालावली. त्यांना बोरगावच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने उपचार केल्याने बाधितांची प्रकृती स्थिर झाली आहे. हिराबाई जानू जाधव, जानू लक्ष्मण जाधव, मोहनाबाई विष्णू जाधव, देवीदास विष्णू जाधव, राणी विनायक जाधव अशी बाधितांची नावे आहेत.

Web Title: Five people from a family are poisoned

टॅग्स :Healthआरोग्य