Five lace jewelry lamps | पाच तोळ्याचे दागिने लंपास
पाच तोळ्याचे दागिने लंपास

पंचवटी : गायकवाड चाळीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे पाच तोळे सोने, चांदीचे दागिने चोरून घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कमलाबाई लबडे या कामावर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, मोहनमाळ तसेच अंगठ्या, असा अंदाजे पाच तोळे वजनाचा ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. लबडे गुरुवारी (दि.३०) सकाळी कामावरून घरी परतल्या असता घराच्या दरवाजाला लावलेले कडीकोयंडा तोडलेले आढळून आले. त्यांनी घरात प्रवेश करताच कपाट उघडे दिसले व त्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत घरफोडी चोरी यांसारख्या घटना वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Web Title:  Five lace jewelry lamps
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.