शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

प्रथमच हाेणार संमेलनाध्यक्षांचे कथाकथन!; प्रभावळकर यांच्या हस्ते बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 06:17 IST

साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे.

नाशिक : साहित्य संमेलनाच्या यापूर्वीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात कधीही न झालेले बालसाहित्य संमेलन यंदा प्रथमच ९४ व्या नाशिकच्या साहित्य संमेलनात रंगणार आहे. या बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन करणार असून, साहित्य संमेलनाच्या इतिहासात असे प्रथमच घडणार आहे.   

साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे. ग्रंथप्रदर्शनाचे आणि संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होईल. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार, यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना अध्यक्षीय सूत्रे प्रदान केली जातील. त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे भाषण होणार आहे. त्याच दिवशी रात्री नऊ वाजता निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल. 

दिलीप प्रभावळकर ठरणार आकर्षण    बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. प्रभावळकर यांची उपस्थिती बालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संमेलनात गांधीवादी विचारवंत आणि प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत आणि मूळ नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार मनोहर शहाणे यांचाही गौरव केला जाणार आहे. ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होणार आहे. सत्कारानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथावाचन आणि कथाकथन होणार आहे. 

शेतकरी आंदोलनावर परिसंवाद     संमेलनाच्या समारोपादिवशी सकाळी मराठी नाटक ‘एक पाऊल पुढे - दोन पावले मागे’ हा परिसंवाद शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा आणि लेखक-कलावंतांचे मौन हा परिसंवाद भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक