नववर्षातील पहिल्याच एकांकिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:50+5:302021-02-05T05:45:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सामाजिकसह वैविध्यपूर्ण विषयांना विनोदी ढंगाने हाताळत रसिक प्रेक्षकांची मनसोक्त दाद मिळवणाऱ्या एकांकिकांनी निखळ मनोरंजन ...

The first one-act play of the New Year | नववर्षातील पहिल्याच एकांकिका

नववर्षातील पहिल्याच एकांकिका

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : सामाजिकसह वैविध्यपूर्ण विषयांना विनोदी ढंगाने हाताळत रसिक प्रेक्षकांची मनसोक्त दाद मिळवणाऱ्या एकांकिकांनी निखळ मनोरंजन केले. कोरोनानंतरच्या काळातील नूतन वर्षात सादर झालेल्या पहिल्याच एकांकिका महोत्सवाला नागरिकांनी भरभरुन दाद दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यरसिक एकांकिका महोत्सव कालिदास कलामंदिर येथे साजरा झाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, नाट्य परिषदेचे बालरंगभूमी अध्यक्ष सचिन शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नाट्यरसिक ग्रुपचे संचालक श्रीराम वाघमारे यांसह अनघा धोडपकर, मिलिंद तारे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन सिद्धी बोरसे आणि श्रुती भावसार यांनी केले. नाट्यरसिकचे दिवंगत सदस्य नरेंद्र सोनवणे लिखित ‘बासुंदी’ या एकांकिकेने महोत्सवाचा पडदा उघडला. मृगजळ या दुसऱ्या एकांकिकेत सिनेजगताबद्दल आढावा घेण्यात आला आहे. या एकांकिकेतील पात्रे या सिनेजगतासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या निगडित आहेत. त्यानंतरच्या तिसऱ्या सेम टू सेम या एकांकिकेत शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांची कहाणी मांडण्यात आली आहे. कुटुंबमैत्री असलेल्या प्रेमीयुगलाच्या प्रेमात अनेक समस्या येतात. त्यातून मार्ग काढताना होणाऱ्या गंमतीजमती उत्तमरीत्या मांडण्यात आल्या आहेत. दुकान कोणी मांडू नये या संजय पवार लिखित एकांकिकेतून लोकांना वाचनाविषयी गोडी लावणे या ध्येयाने झपाटलेला दुकानदार आणि त्याची त्याविषयी तळमळ त्यातून दर्शविण्यात आली. सादर झालेल्या एकांकिकांमध्ये नेहा दीक्षित, शुभम धांडे, रश्मी वरखेडे, पलाश खैरनार, वैभवी चव्हाण, प्रणेता भाटकर, नेहा निमगुळकर, अविनाश खेडकर, नितीन साळुंके, प्रतीक जोशी, सृष्टी शिरवाडकर, पूजा सोनार, रविराज वरखेडे, अश्विनी वाघ, प्रांजल सोनवणे, अनिता सोनवणे या कलाकारांनी भूमिका साकारल्या.

इन्फो

सोनवणे यांना समर्पित महोत्सव

नाट्यरसिकचे दिवंगत सदस्य नरेंद्र सोनवणे यांना हा महोत्सव समर्पित करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच सोनवणे यांनी लिहिलेल्या बासुंदी या एकांकिकेने महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. एक स्त्रीलंपट शालेय शिक्षक हा आदर्श शिक्षक पुरस्काराच्या शर्यतीत असतो. एका विद्यार्थ्याची आई त्याला धडा शिकवून कसे वठणीवर आणते, हे त्या एकांकिकेत मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या एकांकिकेचे दिग्दर्शन महेश खैरनार यांनी केले होते.

फोटो -पीएचजेएन ७८

नाट्यरसिक एकांकीका महोत्सवातील बासुंदी या नाटकातील एक क्षण .

Web Title: The first one-act play of the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.