नाशिक : नववर्षाचा उगवलेला चांदोबा तेजासह आकारानेही अधिक मोठा असल्यामुळे त्याला खगोलीय भाषेत ‘सुपरमून’ असे म्हटले गेले. या महिन्यात असा खगोलीय बदल येत्या ३१ तारखेलाही होणार असून, नववर्षाच्या पहिल्या चंद्राप्रमाणेच जानेवारी २०१८चा अखेरचा चंद्रही ‘सुपरमून’ ठरणार आहे.‘सुपरमून’च्या योगामुळे घडलेला हा आविष्कार डिसेंबर महिन्याप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहावयास मिळाल्याने नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला तर तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी नाशिक करांना सोमवारी (दि.१) मिळाली. या संधीचा खगोलप्रेमींनी पुरेपूर आनंद लुटला. काहींनी दुर्बिणीतून तर काहींनी टेलिस्कोपच्या आधारे सुपरमूनचा वाढलेला आकार आणि तेजाचा आनंद लुटला.पृथ्वीचा उपग्रह अर्थात चंद्र पृथ्वीभोवती सतत लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. त्यामुळे काही वेळा तो पृथ्वीच्या जवळ येतो, तर काही वेळा लांबही जातो. पौर्णिमेच्या काळात तो पृथ्वीच्या जवळ आल्यास त्याचा आकार मोठा दिसतो. या चंद्राला ‘सुपरमून’ असे संबोधले जाते. वर्षातून एकदा किंवा दोनदा ही घटना घडत असते. यावर्षी एक तारखेप्रमाणेच ३१ तारखेलाही असाच खगोलीय बदलाचा आविष्कार पहावयास मिळणार आहे. त्यामुळे ज्या खगोलप्रेमींना या नववर्षाचा पहिला सुपरमून बघता आला नाही त्यांनी चिंता न करता या महिन्याचा अखेरचा चंद्र बघण्यासाठी स्मार्टफोनमध्ये ‘रिमाइन्डर’ लावण्यास हरकत नाही. डिसेंबर महिन्यात अनेकांना हा सुपरमून बघता आला नव्हता कारण मध्यरात्री चांदोबा ‘मोठे’ झाले होते. खगोल शास्त्रज्ञ रिचर्ड नोले यांनी सन १९७९ मध्ये सर्वप्रथम या आविष्काराला ‘सुपरमून’ असे नाव दिले होते.
नववर्षाचा पहिला चंद्र ठरला ‘सुपरमून’निसर्गाचा आविष्कार :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:02 IST
नाशिक : नववर्षाचा उगवलेला चांदोबा तेजासह आकारानेही अधिक मोठा असल्यामुळे त्याला खगोलीय भाषेत ‘सुपरमून’ असे म्हटले गेले. या महिन्यात असा खगोलीय बदल येत्या ३१ तारखेलाही होणार असून, नववर्षाच्या पहिल्या चंद्राप्रमाणेच जानेवारी २०१८चा अखेरचा चंद्रही ‘सुपरमून’ ठरणार आहे.
नववर्षाचा पहिला चंद्र ठरला ‘सुपरमून’निसर्गाचा आविष्कार :
ठळक मुद्दे३१ जानेवारीला पुन्हा संधी आकार १४ तर तेज ३० टक्क्यांनी वाढले