चांदवड तालुक्यातील पहिले कोविड सेंटर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:29 IST2021-05-16T00:28:34+5:302021-05-16T00:29:00+5:30
वडनेर भैरव : येथील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार वेळेत झाल्यास पुढील जीवघेणे अनर्थ टळतील म्हणून चांदवड तालुक्यातील पहिले ग्रामीण भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर विलगीकरण या परिसरात सुरू करण्यात आले.

चांदवड तालुक्यातील पहिले कोविड सेंटर कार्यान्वित
वडनेर भैरव : येथील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार वेळेत झाल्यास पुढील जीवघेणे अनर्थ टळतील म्हणून चांदवड तालुक्यातील पहिले ग्रामीण भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर विलगीकरण या परिसरात सुरू करण्यात आले.
रुग्णवाढीचा वेग हा कमी जरी होत असला तरीसुद्धा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत शासकीय नियमांचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी वडनेर भैरव सेंटर व विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांना केले.
अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी होते. वडनेर भैरव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी वडनेर भैरवचे भूमिपुत्र भाऊसाहेब चौधरी यांनी वडनेर भैरवच्या जन्मभूमीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड उपचार व विलगीकरण केंद्र सुरू केले आहे.
चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वडनेर भैरव येथे कोरोना रुग्ण उपचारासाठी स्वखर्चाने ऑक्सिजन बेड व वैद्यकीय सेंटर सुरू केले आहे. भुसे यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोविड सेंटरचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. वडनेर भैरवचे सरपंच सुनील पाचोरकर व उपसरपंच योगेश साळुंखे यांच्या हस्ते भुसे व चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. संपत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी माजी आमदार उत्तम भालेराव, ग्रामपंचायत मार्गदर्शक बापूसाहेब पाचोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख सुनील पाटील, उपप्रमुख नितीन आहेर, नीलेश पाटील, तालुका शिवसेना प्रमुख विलास भवर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन वडनेर भैरव शिवसेना जिल्हा परिषद गट प्रमुख संतोष मोहन, सुमित भालेराव, युनूस मणियार, लक्ष्मण सलादे, नाना वाटपाडे, नवनाथ शिंदे, विजय निखाडे यांनी केले.
विशेष सत्कार वडनेर भैरव येथे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक कोटी एकवीस लाख रुपये द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये योगदान असलेले वडनेर भैरवचे एपीआय गणेश गुरव यांचा गौरव वडनेर भैरव शेतकऱ्यांचा वतीने करण्यात आला.
(१५ वडनेर भैरव, १).