शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

By admin | Updated: April 3, 2015 01:46 IST

जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

नाशिक : राजकारणात कोणतीही आश्वासने देऊन सत्तेवर येणे सोपे असते, मात्र पूर्ण करणे किती अवघड असते, हे आजच्या राज्य व केंद्रातील सरकारला आता कळाले असेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.येथील रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बाळासाहेब थोरात यांनी, ‘राज्यातील आजवर झालेले मुख्यमंत्री व त्यांच्या पुढील आव्हाने’ या विषयावर मुक्तचिंतन व्याख्यान दिले. बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाणांपासून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या स्वभावातील गुणवैशिष्ट्ये व त्यांच्या काळातील त्यांच्यापुढील आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात धरणे बांधण्यासाठी प्राधान्य दिले. शरद पवार यांना राज्याची दिशा माहीत होती आणि त्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून गाजले. त्यांच्या काळात गुंडगिरी मोडीत निघाली.वसंतदादा पाटील कमी शिकलेले, मात्र दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री होते.शिवाजीराव निलंगेकर, सुधाकर नाईक, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी त्या त्या काळातील आव्हाने सांगितली. आताच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा खूपच वाढवून ठेवल्या, मात्र त्या पूर्ण करणे किती अवघड आहे, याची प्रचिती त्यांना येत आहे, असे थोरात यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रवीण खाबिया, सुनील बुरड, मोहनलाल लोढा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)