विविध उपक्रमांनी रंगणार शाळेचा पहिला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:01 IST2018-06-12T13:01:51+5:302018-06-12T13:01:51+5:30
पेठ - शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्र मण करत असतांना तो दिवस मात्र प्रत्येकाच्या चिरकाल स्मरणात राहतो.नवे कपडे, नवी पुस्तके, दप्तर आणी शाळेविषयीची आत्मिक भिती त्यातच शाळेचे वातावरण आणी त्या दिवशी घडणारा सर्वच घटनाक्र म आठवणीत राहून जातो.

विविध उपक्रमांनी रंगणार शाळेचा पहिला दिवस
पेठ - शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्र मण करत असतांना तो दिवस मात्र प्रत्येकाच्या चिरकाल स्मरणात राहतो.नवे कपडे, नवी पुस्तके, दप्तर आणी शाळेविषयीची आत्मिक भिती त्यातच शाळेचे वातावरण आणी त्या दिवशी घडणारा सर्वच घटनाक्र म आठवणीत राहून जातो. शिक्षण विभागानेही गत पाच वर्षापासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत नव्याने दाखल होणार्या नवागत बालकांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव सुरू केला आहे. मुलांना मराठी त्यातही सरकारी शाळांची गोडी लागावी, शाळा व शिक्षकांविषयीची भिती दुर व्हावी, आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी दरवर्षी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येतो. शाळा सुरू होण्याच्या दोन आधीच शाळा, वर्गखोल्या, आवार, क्रि डांगण व परिसराची स्वच्छता करण्यात येत असून पाहिल्या दिवशी शाळेत विविधरंगी फुलांची तोरणे, रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. नवागतांचे स्वागत : शिक्षणासाठी नव्यानेच शाळेत पिहलेच पाऊल ठेवणार्या बालकाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून शाळा सुरू होण्याच्या पुर्वसंध्येला जनजागृतीसाठी मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या पिहल्या दिवशी नवागतांची सजवलेल्या बैलगाडी, ट्रॅक्टर, घोडागाडी, पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शाळेच्या प्रवेशव्दारावर शिक्षक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समतिी सदस्य बालकांचे गुलाबपुष्प, मिठाई, शैक्षणकि साहित्य प्रदान करून स्वागत करतील. शाळेचा पिहला दिवस हा वाढिदवस साजरा करण्यात येणार असून शाळा शाळांमध्ये केक कापून हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.